शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू वाहनांतून छुपी प्रवासी वाहतूक; जिवनावश्यक वस्तू वाहतूक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 17:19 IST

मालवाहू वाहने, टँकर, कन्टेनरमध्ये लपून प्रवास करीत असल्याच्या घटना राज्यभरात वारंवार उघडकीस येत आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम: परराज्यात, महानगरात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले कामगार आपल्या गावी परत येत आहेत. तथापि, एसटी, रेल्वे बंद असतानाच शासनाने जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे ही मंडळी मालवाहू वाहने, टँकर, कन्टेनरमध्ये लपून प्रवास करीत असल्याच्या घटना राज्यभरात वारंवार उघडकीस येत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूंची वाहनेही पोलिसांच्या चेकपोष्टवर रोखली जात आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स हा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने १५ एप्रिलपर्यंत देशभरात ‘लॉकडाऊन’चे आदेश दिले आहेत. राज्यशासनानेही याची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करताना जिवनावश्यक वस्तू वगळता सर्वच प्रकारची आंतरजिल्हा वाहतूक रोखली आहे. यामुळे परराज्यात किंवा महानगरात कामासाठी गेलेल्या कामगारांना घरी परतण्याचे मार्ग बंद झाले आहेत. राज्य शासनाने अशा लोकांची काळजी घेण्याची हमी दिली असली तरी, कोरोना विषाणूचा वाढता संसर्गाने त्यांच्या उरात धडकी भरविली आहे. त्यामुळेच ही मंडळी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून कुठल्याही स्थितीत घरी पोहोचण्याची धडपड करीत आहे. यासाठी ही मंडळी जिवनावश्यक सेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा प्रवासासाठी आधार घेत आहेत. यात दुधाचा टँकर, मालवाहतुकीचा कन्टेनर आदि प्रवासी वाहतुकीसाठी घातक असलेल्या वाहनांत जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारासाठी संबंधित वाहनधारक त्यांच्याकडून वारेमाप पैसा वसुल करीत आहेतच शिवाय यातून भीषण अपघातही घडले आहेत. अशा प्रकारांमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविणे कठीण होणार आहेच शिवाय इतरही समस्या उद्भवणार आहेत. त्यामुळेच राज्यभरातील विविध मार्गावर जिवनावश्यक वस्तुंची वाहनेही पोलिसांकडून रोखून ठेवली जात असून, पूर्ण शाश्वती झाल्यानंतर अशा वाहनांना पुढील प्रवासासाठी सोडले जात आहे. रुग्णवाहिकेचाही घेतला जातोय आधारमहानगरांतून आपापल्या गावी परतण्यासाठी धडपड करणारी मंडळी खासगी मालवाहू वाहनांसह कन्टेनर, टँकरचा आधार घेत आहेतच. त्याशिवाय गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून वापरल्या जाणाºया रुग्णवाहिकांतूनही प्रवासी वाहतूक होत असल्याचे प्रकार राज्यात विविध ठिकाणी उघडकीस येत आहेत.

टॅग्स :washimवाशिम