शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पक्षअस्तित्वाच्या लढाईत काँग्रेसची सरशी

By admin | Updated: October 20, 2014 00:58 IST

अमित झनकांनी जिल्ह्यात राखले काँग्रेसचे अस्तित्व : मतपेटीतून उघडले वास्तव, लढत दुरंगीच.

वाशिम : सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी ही लढाई असल्याचे स्पष्ट करत रिसोड मतदारसंघात स्वबळावर उडी घेतली होती. या प्रत्येक पक्षाला रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदार राजा मतपेटीतून काय उत्तर देतो, याची उत्सुकता सर्वांंनाच लागली होती. प्रत्यक्षात १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीतून मतदार राजाने आपला कौल दिला असून, काँग्रेसचे अमित झनक यांनी पुन्हा एकदा रिसोड मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. युती, आघाडीच्या ह्यएकला चलो रेह्णच्या भूमिकेने विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला जनतेचा कौल मिळेल, कोणत्या पक्षाचे उमेदवार कोण असतील, त्यांना मतदारांचा कितपत प्रतिसाद मिळू शकतो, या विषयी चर्चेच्या फैरी विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाल्यापासूनच झडू लागल्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने अमित झनक, भारतीय जनता पार्टीकडून अँड. विजय जाधव रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेसने बाबाराव खडसे पाटील, शिवसेनेने विश्‍वनाथ सानप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजू पाटील राजे, भारिप-बहुजन महासंघाने डॉ. रामकृष्ण कालापाड, बहुजन समाज पार्टीने सुभाष देवढे पाटील, रिपाइंने मुरलीधर मोरे, राष्ट्रीय किसान काँग्रेस पार्टीने नूर अली शाह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यासह संतोष बाबर, रमेश अंभोरे, सदानंद तायडे, संजय कांबळे, गणेश भेराणे, भगीरथ भोंडणे, रामचंद्र वानखेडे हे अपक्ष उमेदवार मिळून १६ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. सुरुवातीला बहुरंगी, त्यानंतर तिरंगी व नंतर थेट दुरंगी झालेल्या लढतीत काँग्रेसच्या अमित सुभाषराव झनक यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे संकेत दिले होते.