डेंग्यूचा प्रादुर्भाव; हिवतापाच्या रुग्णांतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:48 IST2021-09-12T04:48:02+5:302021-09-12T04:48:02+5:30

^^^^^ मनरेगातून गावाची समृद्धी साधण्याबाबत मार्गदर्शन ! वाशिम : मनरेगाच्या माध्यमातून गावाचा विकास साधून गाव कसे समृद्ध करता येईल, ...

Outbreak of dengue; Also an increase in malaria patients | डेंग्यूचा प्रादुर्भाव; हिवतापाच्या रुग्णांतही वाढ

डेंग्यूचा प्रादुर्भाव; हिवतापाच्या रुग्णांतही वाढ

^^^^^

मनरेगातून गावाची समृद्धी साधण्याबाबत मार्गदर्शन !

वाशिम : मनरेगाच्या माध्यमातून गावाचा विकास साधून गाव कसे समृद्ध करता येईल, याबाबत मनरेगा राज्य प्रशिक्षक तथा जलदूत रवींद्र इगोले यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. सामाजिक वनीकरण विभागाच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रोपवाटिकेत हा कार्यक्रम पार पडला.

---

संत्रा लागवड, मृग बहार व्यवस्थापन प्रशिक्षण

वाशिम : आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या संत्रा या पिकाचे योग्य वेळेत योग्य ते व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र काळे कृषी विज्ञान केंद्र, वाशिमच्या मार्गदर्शनाखाली व कृषी विभागाकडून संत्रा लागवड व मृग बहार व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना संत्रा लागवडीबाबत तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले जात आहे.

--------------------

कीटकनाशक फवारणीत शेतकरी व्यस्त

वाशिम : सध्या सोयाबीन, तूर, कपाशी या खरीप पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे उत्पादन घटण्याची भीती असल्याने कीड नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या कीटकानाशकांची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे १० ते ११ सप्टेंबरदरम्यान दिसून आले.

--------------------

धरणावर वाढली झुडपे

वाशिम : तालुक्यातील खंडाळासह इतर काही धरणाच्या भिंतीवर मोठमोठी वृक्ष वाढली असून, मूळ खोलवर जाऊन धरणाच्या भिंतीला धोका उद्भवण्याची भीती आहे. पाटबंधारे विभागाने याची दखल घेऊन धरणावरील झुडपे छाटावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

--------------------

Web Title: Outbreak of dengue; Also an increase in malaria patients