शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन खरेदीत ३५0 टक्कय़ांची वाढ!

By admin | Updated: October 10, 2014 00:26 IST

मॉल्समधील खरेदीत ४६ टक्कय़ांची घट.

लक्ष्मीकांत भागवत/अकोलादिवाळीच्या पृष्ठभूमिवर भारतात ऑनलाईन शॉपिंगमध्ये ३५0 टक्के वाढ नोंदविण्यात आली असल्याचा दावा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉर्मस अँन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (दक्षिण)चे महासचिव डी.एस. रावत यांनी केला आहे. याचा परिणाम मोठय़ा शहरातील मॉल्समधील विक्रीवर झाला असून, त्यात सुमारे ४६ टक्के घट झाली आहे. गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ऑनलाईन खरेदी २00 टक्के होती, ती आक्टोबरमध्ये थेट ३५0 ट क्यांवर गेली आहे. दिवाळीदरम्यान ऑनलाईन शॉपिंगचे मार्केट १0 हजार कोटी रुपयांचा टप्पा पार करण्याची शक्यता एका सर्वेक्षणाद्वारे व्यक्त होत आहे. हा सर्व्हे भारतातील दिल्ली-एनसीआर, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकता, हैदराबाद, चेन्नई, बंगलोर, चंदीगड आणि देहरादून या १0 मोठय़ा शहरात करण्यात आला आहे. ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल असाच कायम राहिल्यास १२ हजार कोटी रुपयांचा ऑनलाईन शॉपिंगचा व्यवसाय येत्या ३-४ वर्षात एक लाख कोटीवर पोहोचण्याचा अंदाजही या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. सणासुदीच्या हंगामात ऑनलाईन शॉपिंगची लाट आली आहे. ऑनलाईनवर सर्व काही उपलब्ध आहे. लहानशा पेनपासून तर अजस्त्र कंबाईन हॉर्वेस्टरपर्यंत सर्व काही ऑनलाईन विकत घेण्याची सोय आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये वस्तू स्वस्त दरात आणि ३-४ दिवसात घरपोच मिळत आहे. नवीन पिढीमध्ये मोबाईल इंटरनेटच्या वाढत्या वापराने ऑनलाईन शॉपिंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मॉल्सपर्यंत जातांना रस्त्यावरची रहदारी, घेतलेल्या वस्तूंचे बिल देण्यासाठी लावावी लागणारी रांग यामुळे ग्राहक ऑनलाईन शॉपिंगकडे वळत आहे. सणासुदींच्या दिवसात वेळेची बचत करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सणासुदीच्या हंगामात ऑनलाईन शॉपिंगमध्ये वाढ नोंदविण्यात आली. * मॉल्समधील विक्रीत मोठी घट असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या (दक्षिण) आकडेवारीनुसार मॉल्समधील विक्रीत मोठी घट आली आहे. दिल्लीच्या एनसीआर मॉल्समध्ये सर्वाधिक ४९.५ टक्के घट नोंदविली आहे. अहमदाबाद ४८.२ टक्के, चेन्नई ४६ टक्के, मुंबई ४२ टक्के आणि हैदराबादेत ३९ टक्के घट झाली आहे. गत दोन वर्षात देशात अंदाजे २५0- ३00 मॉल्स आले; पण या मॉल्समधील ८0-८५ टक्के जागा अद्याप रिकामीच आहे, असेही अहवालात नमूद केले आहे.