जमिनीच्या वादातून एकाची हत्या

By Admin | Updated: October 14, 2014 01:49 IST2014-10-14T01:49:15+5:302014-10-14T01:49:15+5:30

कोयाळी खुर्द येथे सीलिंग जमिनीच्या वादातून खून, आरोपीं अटकेत.

One murdered by land dispute | जमिनीच्या वादातून एकाची हत्या

जमिनीच्या वादातून एकाची हत्या

शिरपूरजैन (वाशिम) : कोयाळी खुर्द येथे सीलिंग जमिनीच्या वादातून नामदेव दस्तुजी गव्हाणे या ६५ वर्षीय इसमाची हत्या झाली. ही घटना रविवारी उघडकीस आली. गव्हाणे यांना मिळालेल्या सीलिंग जमिनीबाबत काही वर्षांंपासून गावातील संजय जिजेबा बोरकर यांच्याशी त्यांचा वाद सुरू होता. या प्रकरणी मृतकाच्या मुलाच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भादंविच्या कलम ३0२, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपी संजय बोरकर, नरहरी बोरकर, केशव बोरकर, मारुती लादे यांना अटक केली.

Web Title: One murdered by land dispute