ट्रक, एसटी, दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 03:47 PM2019-12-16T15:47:37+5:302019-12-16T15:47:49+5:30

राहुल खुलाराम डवले (२८), असे मृतकाचे नाव असून, नथ्थूराम बोरकर (२५) आणि अंबादारस आनंदराव घुले (६०) हे गंभीर जखमी झाले आहेत.

One killed in a truck, ST, bike accident; Two serious | ट्रक, एसटी, दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर

ट्रक, एसटी, दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव: समोरून येणारी एसटी बस आणि मागून येत असलेल्या ट्रकच्यामध्ये दुचाकी आल्याने घडलेल्या अपघातात एक जण ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना कारंजा तालुक्यातील कामरगाव ते विळेगावदरम्यान १४ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. राहुल खुलाराम डवले (२८), असे मृतकाचे नाव असून, नथ्थूराम बोरकर (२५) आणि अंबादारस आनंदराव घुले (६०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले.
विळेगाव येथील राहुल डवले हा नथ्थूराम बोरकर आणि अंबादास घुले यांच्यासह कामरगाव येथे उपचार करून विळेगावकडे परत जात असताना विळेगाव ते कामरगावदरम्यान समोरून येत असलेली एसटी बस आणि मागून येत असलेल्या ट्रकच्यामध्ये ही दुचाकी गेल्याने अपघात घडून राहुल डवले हा घटनास्थळीच ठार झाला, तर नथ्थूराम बोरकर आणि अंबादास घुले हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून अमरावती येथे हलविण्यात आले. या प्रकरणी मृतकाचा भाऊ रामेश्वर डवले याने कामरगाव पोलिसांत तक्रार नोंदविली असून, धनज बु. ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस करीत आहेत
दरम्यान, कामरगाव ते विळेगाव दरम्यान रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून, या मार्गावर वाहनचालकांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे मत उपस्थित ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत होते. आहेत.
(वार्ताहर)

Web Title: One killed in a truck, ST, bike accident; Two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.