एसटीच्या जोरदार धडकेत बाईकस्वाराचा जागीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 18:20 IST2019-02-14T18:20:42+5:302019-02-14T18:20:49+5:30
एसटी बसने बाईकला दिलेल्या धडकेत 40 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. कारंजा-मूर्तीजापूर मार्गावरील इसार पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (14 फेब्रुवारी) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

एसटीच्या जोरदार धडकेत बाईकस्वाराचा जागीत मृत्यू
कारंजा लाड (वाशिम) : एसटी बसने बाईकला दिलेल्या धडकेत 40 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. कारंजा-मूर्तीजापूर मार्गावरील इसार पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (14 फेब्रुवारी) दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तीजापूर (अकोला) तालुक्यातील हिरपूर येथील नारायण बावणे आणि रोहीत भारसाकळे हे दोघे बाईकवरुन मूर्तीजापूरहून कारंजाकडे येत होते. यादरम्यान, विरुद्ध दिशेने अकोल्याला जाणा-या कारंजा आगाराच्या एस.टी. बसने दुचाकीला जबर धडक दिली. यात बाईकस्वार नारायण बावणे यांचा जागीच मृत्यू झाला; तर रोहीत भारसाकळे गंभीर जखमी झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बाईकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
दरम्यान, जखमी रोहीतला कारंजाच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताप्रकरणी एसटी बसचा चालक व्ही.के. देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.