जलशुद्धीकरणात दीड  कोटी लिटर पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 03:11 PM2019-05-18T15:11:58+5:302019-05-18T15:12:03+5:30

जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते.  या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे.

One and half crore liters water wastage in karanja | जलशुद्धीकरणात दीड  कोटी लिटर पाण्याचा अपव्यय

जलशुद्धीकरणात दीड  कोटी लिटर पाण्याचा अपव्यय

googlenewsNext


-  दिवाकर इंगोले 
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा :  जल शुद्धीकरण व जलशीतलीकरण या नादात सत्तर टक्के जल अपव्यय होत आहे. असे जलशुद्धीकरण प्रकल्पाची संख्या शहर व ग्रामीण भागासह १५० अशी आहे. या प्रकल्पातून सत्तर टक्के पाणी वाया जात आहे. म्हणजे एक ग्लास शुद्ध व थंड पाणी पिण्यासाठी चार ग्लास पाणी वाया जाते. पाणी टंचाईच्या काळात हे अपव्यय अतिशय गंभीर असून मुख्याधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराची दखल घेऊन जलपूर्णभरण प्रकिया राबविणे आवश्यक आहे.
पाण्याचे भीषण संकट टाळण्यासाठी जल ही राष्टीय संपत्ती घोषित झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळन्यासाठी सक्तीची कार्यवाहि करणे आवश्यक आहे. कारंजा तालुक्यात ९१ ग्राम पंचायती असून त्या अंतर्गत १३४ गावे आहेत. शहरात ३२ व ग्रामीण विभागात १२८ जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यामुळे ग्रामीण व नागरी परिसरात शुभकार्य प्रसंगी हेच पाणी वापरले जाते. तालुक्यातील सर्व तुष्णातुप्ती केंद्र व व्यापार व्यवसाय प्रतिष्ठाने, औद्योगिकीकरण संस्था, तसेच शासकीय कार्यालय, अशासकीय कार्यालय,घरगुती  उपयोगाकरिता याच पाण्याचा वापर होतो त्यामुळे या पाण्याची मागणी वाढली आहे.
      परंतु ही मागणी पूर्ण करताना जलशुध्दीकरणामुळे ५० ते ७० टक्के पाणी वाया जाते.  या प्रकल्पातुन वाया जाणाºया पाण्याची गणना लिटर्स मध्ये केली असता तालुक्यात सुरू असलेल्या प्रकल्पातून दीड कोटी लिटर्स पाणी वाया जात आहे.
या वाया जाणाºया पाण्याचे सक्तीचे जलपूर्णर्भरण करून, हेपाणी पुन्हा जमिनीच्या उदरात सोडता येईल. तसेच दुष्काळग्रस्त भीषण पाणी टंचाई असलेल्या गावामध्ये  या पाण्याचा उपयोग पेय जल सोडून मुके पाणी व ईतर वापरासाठी उपयोगात आणता येईल. प्रशासनाने प्रत्येक प्रकल्प धारकांसाठी वाया जाणा?्या पाण्यासाठी टाके बांधाने शक्तीचे करावे. त्या टाक्यातून पाणी प्रशासनाने टँकर व्दारे उचल करून या पाण्याचा वापर दुष्काळी गावात पिण्याचे पाणी वगळून इतर वापरासाठी उपयोग  करावा. जलशुद्धीकरनाच्या नावावर तालुक्यात दीड  कोटी पाण्याचा अपव्यय प्रशासनाने दखल घेतल्यास दुष्काळग्रस्त गावाला पाणी पुरवठा होऊ शकतो व वाया जाणारे पाण्याचे नियोजनही योग्यरित्या केल्या जावू शकते, याकरिता पुढाकाराची गरज आहे एवढे मात्र नक्की!
 
वाया जाणारे पाणी जनावरांसाठी 
    वाया जाणाºया पाण्याबाबत आम्ही  गंभीर असून परिसरातील लोकांना जनावारासाठी व वापरासाठी पाणी विनामूल्य उपलब्ध करून देत असल्याचे एम कुलचे संचालक जुनेद मराछिया यांनी सांगितले. असाच प्रयोग सर्वांनी केला तर अपव्यय होणाºया पाण्याचा सदुपयोग होईल.
 
कारंजा शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करून जलपूर्णर्भरण प्रकिया सक्तीचे करण्यात येईल. 
- डॉ अजय कुरवाडे, मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा,
आरोग्याच्या दृष्टीने पाण्याचे शुद्धीकरण महत्वाचे असले तरी वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग कसा करता येईल यांचे प्रशासनाने उचित नियोजन करणे गरजेचे आहे. 
- डॉ निलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ कारंजा 
जलशुद्धीकरण करतांना पाण्याचा अपव्यय ही गंभीर बाब असून यांचे जलव्यवस्थापणाव्दारे नियंत्रण व्हायला हवे.
- अ‍ॅड . विजय बगडे,  माजी नगराध्यक्ष कारंजा

Web Title: One and half crore liters water wastage in karanja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.