शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाची कामे वाढविण्यासाठी आता संस्थांची मदत!

By admin | Updated: October 14, 2014 00:31 IST

आठ जिल्ह्यातील १३ तालुक्यांची निवड.

बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचे महत्त्व ग्रामीण भागातील जनतेला पटवून देण्यासाठी आता स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधील १३ तालुक्यांची निवड करण्यात आली असून, योजनेची अंमलबजावणीदेखील सुरु करण्यात आली आहे. खरीप, रब्बी हंगामाची कामे संपल्यानंतर मजुरांच्या हाताला फारशी कामे नसतात. त्यामुळे रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग मोठय़ा प्रमाणात शहरांकडे धाव घेतो. त्यामुळे खेडी ओस पडत होती. हे चित्र बदलविण्यासाठी मजुरांना किमान शंभर दिवसांच्या कामाची हमी मनरेगांतर्गत देण्यात आली; पण अद्याप मनरेगाला ग्रामीण भागात व्यापक स्वरूपात प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे योजनेचा उद्देश साध्य होत नव्हता. केंद्र शासनाने ग्रामीण भागात मनरेगाची कामं वाढविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका कार्यक्रमां तर्गत स्वंयसेवी संस्थाची मदत घेण्याचा निर्णय घेतला. या स्वंयसेवी संस्था निवड केलेल्या प्रत्येक तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतीचे तीन गट तयार करणार आहे. संबंधित गावांचा अभ्यास करून ितथे कोणती विकास कामे राबविण्याची गरज आहे, याविषयी ग्रामपंचायतीना मार्गदर्शन करणार आहेत. ही कामं करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला दरवर्षी २८ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून, स्वंयसेवी संस्थांना त्यासाठी आर्थिक मोबदलाही दिला जाणार आहे. हा प्रकल्प २0१६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. याशिवाय मागास प्रवर्गातील मजुरांना जास्त प्रमाणात कामं उपलब्ध करून देण्यावर भरही दिला जाणार आहे. निवड करण्यात आले तालुके जिल्हा             तालुक्यांची संख्या गडचिरोली               २ यवतमाळ                ३ अमरावती                १ नाशिक                   २ नंदूरबार                  २ उस्मानाबाद             १ जालना                    १ वाशिम                    १ एकूण                    १३