आता ग्रा.पं. स्तरावरच होणार रोपवाटिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:55 IST2017-08-11T01:54:56+5:302017-08-11T01:55:19+5:30
वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पुढील वर्षी राज्यात जवळपास १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील रोपांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

आता ग्रा.पं. स्तरावरच होणार रोपवाटिका!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत पुढील वर्षी राज्यात जवळपास १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील रोपांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात जुलै २0१८ मध्ये १३ कोटी व जुलै २0१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यालाही वाढीव उद्दिष्ट प्राप्त होणार असल्याने मोठय़ा प्रमाणात रोपांची आवश्यकता भासणार आहे. या रोपांची निर्मिती जिल्ह्यातच करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. त्यानुसार रोहयोंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर रोपवाटिका तयार करण्यास परवानगी दिली जाईल. ग्रामपंचायतींनी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन रोजगार हमी योजना शाखेचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी गुरुवारी केले.