शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मेडशी येथील युवकांनी तयार केली निर्मलग्रामची चित्रफीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:16 IST

उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्देशाने तालुक्यातील मेडशी या गावातील हौशी युवकांनी वेशभूषा परिधान करून चित्रफीत तयार केली. त्यात निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला असून, ही चित्रफीत सध्या व्हॉट्स अँप, फेसबुकवर चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्दे‘स्वच्छ भारत’चा प्रचारउघड्यावरील हगणदरी रोखण्याचे प्रयत्न

अरविंद गाभणे। लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्देशाने तालुक्यातील मेडशी या गावातील हौशी युवकांनी वेशभूषा परिधान करून चित्रफीत तयार केली. त्यात निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला असून, ही चित्रफीत सध्या व्हॉट्स अँप, फेसबुकवर चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे. जावेद भवानीवाले या युवकाच्या शेतातील पडीक जमिनीवर झोपडी आहे. त्या ठिकाणी आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याने निर्मलग्राम योजनेच्या प्रचार-प्रसाराच्या अनुषंगाने चित्रफीत तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने ज्याला शोभेल तशी सरपंच, गुडमॉर्निंग पथक, गावकरी, आजारी व्यक्तींची भूमिका देण्यात आली. याद्वारे संबंधित युवकांनी शौचालयांचा वापर करण्याचा आणि गावकुसात कायम स्वच्छता राखण्याचा मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी जावेदअली भवानी याच्यासह मोसिन धन्नू भवानीवाले, सुमित गुडदे, आकाश  खिल्लारे, मोहन सावळे, रहीम बागवान या युवकांनी पुढाकार घेतला. ही चित्रफीत सध्या सोशल मीडियावर चांगलीच धूम करीत आहे. 

जावेदने रचले संतांचे अभंग!मेडशी येथील रहिवासी जावेदअली भवानीवाले या युवकाने संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर आधारित ‘संतांनो आम्हा अभिमान आहे’ हा अभंग रचला असून, त्यास या साहित्याप्रती अकोट येथे आयोजित राज्यस्तरीय अभंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. चालू वर्षी जानेवारी महिन्यात ही स्पर्धा झाली होती.-