शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयात काँग्रेसच्या हातावर राष्ट्रवादीची घड्याळ कायमच !

By admin | Updated: October 5, 2014 01:50 IST

मालेगाव व वाशिम पंचायत समितीसह रिसोड, मंगरुळपीर न.प.मध्ये आघाडी.

संतोष वानखडे/वाशिमविधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फारकत घेतली असली तरी, वाशिम जिल्हा परिषदेत मात्र दोन्ही काँग्रेस सत्तेचा संसार गुण्यागोविंदाने हाकत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाची ठिणगी जिल्हा परिषदेच्या संसारात काय ह्यआगह्ण लावते, यावर मिनी मंत्रालयाचे ह्यराजकारणह्ण अवलंबून आहे.घटस्थापनेच्या दिवशीच झालेल्या दोन राजकीय घटस्फोटांमुळे महाराष्ट्राचे राजकारण निराळ्या वळणावर जाऊन उभे राहिले आहे. २५ वर्षांपासूनची शिवसेना-भाजपा युती व दीड दशके सत्तेच्या राजकारणात परस्परांना अवघड घडीतही हात देणारी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी तुटली. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेल्या शरद पवारांनी स्वाभिमानाच्या मुद्यावर राष्ट्रवादीची स्वतंत्र चूल मांडली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळे लढले आणि निकालानंतर दोघांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली. २00४ व २00९ ची निवडणूक दोघांनी एकत्रितपणे लढविली आणि पुन्हा सरकार स्थापन केले. २0१४ मध्ये सत्ताधारी आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मैत्रीला सोळावं वरीस धोक्याचं ठरलं. १५ वर्षांची आघाडी फुटल्यानंतर जास्तीत-जास्त जागा स्वबळावर जिंकण्याचे आव्हान स्वीकारून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. राज्यस्तरावरील घटस्फोटाचे लोण स्थानिक स्वराज्य संस्थेतही पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात असतानाच, वाशिम जिल्ह्यात मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेत गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे सध्यातरी चित्र आहे.