शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

एनसीसीचे एनराॅलमेंट क्रमांक अखेर जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:46 IST

वाशिम : अमरावती येथील ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’कडून यंदा एनसीसी प्रवेशासाठी आवश्यक असलेले एनराॅलमेंट क्रमांक जाहीर झालेले नव्हते. त्यास बराच ...

वाशिम : अमरावती येथील ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’कडून यंदा एनसीसी प्रवेशासाठी आवश्यक असलेले एनराॅलमेंट क्रमांक जाहीर झालेले नव्हते. त्यास बराच विलंब झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. यासंदर्भात ‘लोकमत’ने २६ ऑगस्टच्या अंकात ‘एनसीसी’च्या प्रवेशाला मुहूर्त मिळेना, या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्याची तत्काळ दखल घेत वाशिमच नव्हे; तर विभागातील इतर चार जिल्ह्यांनाही एनराॅलमेंट क्रमांक देण्यात आल्याने एनसीसीमध्ये विद्यार्थी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

शाळा स्तरावर इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दरवर्षी राष्ट्रीय छात्रसेना अर्थात ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया जुलै महिन्यात पूर्ण केली जाते. असे असताना यंदा त्यास विलंब लावण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, एनसीसीमध्ये प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या विषयाकडे ‘लोकमत’ने लक्ष पुरवून २६ ऑगस्टच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून वृत्ताचे कात्रण पाचही जिल्ह्यांमध्ये झपाट्याने पसरले. त्यामुळे तत्काळ दखल घेत अमरावती येथील एनसीसीच्या ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’ने विभागातील पाचही जिल्ह्यांना एनराॅलमेंट क्रमांक देऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

...............

बाॅक्स :

जिल्ह्यात होणार १०१ प्रवेश

जिल्ह्यात तीन शाळांमध्ये ‘एनसीसी’त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यात वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयात ३८, न. प. महात्मा गांधी विद्यालय २५ आणि मंगरूळपीर येथील जि. प. शाळेत ३८ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांना ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

.......................

विद्यार्थ्यांची चाचणी घ्यायला ‘आर्मी’ची चमू येणार

इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये प्रवेश देत असताना त्यांची चाचणी घेण्यासाठी ३ ते ५ जणांचा समावेश असलेली आर्मीची चमू लवकरच संबंधित शाळांमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली.

..................

कोट :

दरवर्षी साधारणत: जुलै महिन्यात ‘एनसीसी’ची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. यंदा मात्र ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’कडून एनराॅलमेंट क्रमांक मिळण्यास विलंब झाल्याने प्रक्रिया लांबणीवर पडली. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे आता एनराॅलमेंट क्रमांक मिळाले असून प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली आहे.

- अमोल काळे, एनसीसी अधिकारी, श्री बाकलीवाल विद्यालय, वाशिम