राजस्थान कला महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:30 IST2021-09-02T05:30:30+5:302021-09-02T05:30:30+5:30

दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. सुमित कुमार पाठक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या ...

National seminar at Rajasthan College of Arts | राजस्थान कला महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

राजस्थान कला महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. सुमित कुमार पाठक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य यावर सखोल विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. संचेती यांनी संपूर्ण चर्चासत्र आयोजनासंदर्भात प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार भगत यांनी केले. तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक पुरुषोत्तम वानखडे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. डॉ. हेमंत कुमार वंजारी यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.शैलेश कुमार सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज कुमार मोरे, डॉ. एस. ए. पवार, प्रा. दिनेश इंगळे यांनी सहकार्य केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. मस्के यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला प्राप्त झाले.

Web Title: National seminar at Rajasthan College of Arts