वाशिममध्ये कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना नगर परिषदेच्या नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:25 PM2019-02-02T13:25:13+5:302019-02-02T13:25:33+5:30

वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत.

Municipal Council notice to tax payers in the tax exhausted | वाशिममध्ये कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना नगर परिषदेच्या नोटिस

वाशिममध्ये कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना नगर परिषदेच्या नोटिस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत. कर विभागाची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे.
सन २०१७-१८ या वर्षातील संपूर्ण कर व्याजासहित येत्या १५ दिवसांत अदा करण्याच्या लेखी नोटिस थकबाकीदार कुटूंबांना दिल्या जात आहेत. विहित मुदतीत कर अदा न केल्यास त्यानंतर कुठलीही पुर्वसूचना न देता महाराष्ट्र नगर परिषदा व नगर पंचायती अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही संबंधित नागरिकांना नगर परिषदेकडून दिला जात आहे. 


शहराचा विकास व सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी करवसुली शंभर टक्के होणे महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून कराचा भरणा केल्यास शहराचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
- वसंत इंगोले, मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम
 
थकीत कर असणाऱ्या नागरिकांनी वेळच्या आत कराचा भरणा करून होणाऱ्या कारवाईस टाळावे . कराचा भरणा करुन शहर विकासाला हातभार लावावा
- अब्दुल अजिज अब्दुल सत्तार
कर निरिक्षक, न.प. वाशिम

Web Title: Municipal Council notice to tax payers in the tax exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.