शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल वसुलीसाठी महावितरणची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:41 IST

माझे वीजबिल, माझी जबाबदारी अभियानांतर्गत आयोजित सायकल रॅलीची सुरुवात वाशिम मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय मानकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी ...

माझे वीजबिल, माझी जबाबदारी अभियानांतर्गत आयोजित सायकल रॅलीची सुरुवात वाशिम मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय मानकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. या रॅलीत वाशिम विभागाचे कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण, प्रकाश ढंगारे, व्यवस्थापक कुणाल गजभिये यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. वाशिम मंडळाची घरगुती, वाणिज्य, औद्योगिक ग्राहकांची थकबाकी ४९ कोटी, कृषीपंपांची थकबाकी १५० कोटी, पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १० कोटी, स्ट्रीट लाईटची थकबाकी ८० कोटी असून एकूण थकबाकी ७८९ कोटी आहे. वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे महावितरणची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर वीजबिल वसुलीस वेग देण्यासह थकित वीजबिलाचा भरणा करण्यासाठी वीज ग्राहकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने १६ मार्च रोजी महावितरण वाशिमकडून वाशिम शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत वीजबिल भरा, महावितरणला सहकार्य करा, माझे वीजबिल माझी जबाबदारी अशा घोषणा देऊन वीजग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. कृषीपंप वीजजोडणी धोरण- २०२० ची माहिती जिल्हावासियांना देण्यात आली. यावेळी वाशिम मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय मानकर यांनी महावितरण कंपनी ही जनतेला प्रकाशमय करण्याचे काम करीत असून, या कंपनीचे जतन व प्रगती करण्याची जबाबदारी सर्व जनतेची असल्याचे सागितले. कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे, पी. के. चव्हाण, प्रभाकर लहाने, शिरीष इंगोले यांनी जनतेला वीजबिल भरणा करण्याचे आवाहन केले. या मोहिमेत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी मिळून २५ जणांनी सहभाग घेतला होता.