मानोरा : तालुक्यातील भोयनी येथील २१ वर्षीय युवतीची छेडछाड करीत समाज माध्यमावर छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या भोयणी येथीलच चार आरोपीविरुद्ध २५ सप्टेंबर रोजी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. ही घटना शुक्रवारी २४ सप्टेंबर रोजि घडली असून २५ सप्टेंबर रोजि सायंकाळी तक्रार देण्यात आली.
२१ वर्षीय तरुणी व तिचे वडीलांनी दिलेल्या फिर्यदिनुसार, आरोपी अक्षय माणिक आडे याचेसोबत पिडीत युवतीचे प्रेम संबध होते. नोंदणी विवाह करण्याचेदेखील ठरले होते. यासंदर्भात वाशिंम येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात प्रस्ताव सादर केला असता, त्याला ९० दिवसाचा कालावधि लागणार होता. ही बाब अक्षयच्या वडिलाला माहित झाली म्हणून त्याचे वडिल माणिक सीताराम आडे यांनी पिडीतेच्या वडिलावर दबाव टाकून पिडीतेकडून आपसी समझोता लिहून घेतला. दरम्यान, २४ सप्टेंबरच्या अक्षय हा पिडीतेच्या घरात येउन अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला असता, पिडीतेने आरडाओरड केली. यामुळे अक्षय आडे याने तेथून पळ काढला. पिडीतेचे काका व वडिल अक्षय आडेच्या घरी ही बाब सांगण्याकरिता गेले असता आरोपी अक्षय माणिक आडे, नीलेश माणिक आडे, भाऊराव रतिराम आडे, माणिक रतिराम आडे यांनी शिवीगाळ केली तसेच अक्षय याने छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची तसेच तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. यावरून मानोरा पोलिसांनी चार आरोपी विरुद्ध कलम ३५४ अ, ४५२, २९४, ५०६, ३४ भादवी प्रामाने गुन्हे दाखल केले. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार विजय जाधव करित आहेत.