मंगरुळपीर (जि. वाशिम): शहरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलानेच बलात्कार केल्याची घटना मंगरुळपीर येथे ४ सप्टेंबरपूर्वी घडली. याप्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे, की मुलीला घरी सोडून ती तीन महिने राजस्थानला गेली होती. त्यावेळी एका अल्पवयिन मुलाने ४ सप्टेंबर २0१५ च्या पूर्वी घरात घुसून त्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकारच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३७६ (२) (सी) (एल) आयपीसी कलम ३४५ (के) बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास ठाणेदार गिरमे करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}