बेंबळा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:11 IST2022-07-18T16:11:16+5:302022-07-18T16:11:48+5:30

धनज बु येथून ३ किमी अंतरावर राहाटी येथून वाहणाऱ्या बेंबळा नदीला पूर आल्यामुळे नदी काठीवरील आंबोडा सिरसोली या गावांचा संपर्क तुटला आहे.

Many villages were cut off due to flooding of Bembala river | बेंबळा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

बेंबळा नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

वाशिम : धनज बु. (ता. कारंजा)परिसरात १७ जुलैच्या रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने बेंबळा नदीला पूर आला. परिणामी नदी काठावरील गावांचा संपर्क तुटला आहे.

धनज बु येथून ३ किमी अंतरावर राहाटी येथून वाहणाऱ्या बेंबळा नदीला पूर आल्यामुळे नदी काठीवरील आंबोडा सिरसोली या गावांचा संपर्क तुटला आहे.  दुसरीकडे बेंबळा नदी अमरावती व वाशिम सीमेलगत साखरा येथून वाहत असल्याने अमरावती जिल्ह्यातील साखरा, चाकोरा, वाढोणा सिद्धनाथपुर या गावांचा संपर्क तुटला आहे. 

पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. शेती जलमय झाली आहे.  प्रशासनाने नदी काठीवरील गावांचा तुटणारा संपर्क बघता तात्काळ मदत पुरवावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Many villages were cut off due to flooding of Bembala river