शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

‘किचनशेड’मध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:12 IST

देपूळ: इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्ग केवळ दोन खोल्यांमध्ये दाटीने बसविल्या जात आहेत, तर एक वर्ग चक्क पोषण आहार शिजविल्या जाणार्‍या किचन शेडमध्ये भरविण्याचा प्रकार वाशिम तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

ठळक मुद्देमाळेगाव येथील प्रकारजि.प. शाळा इमारतीची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ: इमारतीची दुरवस्था झाल्याने चार वर्ग केवळ दोन खोल्यांमध्ये दाटीने बसविल्या जात आहेत, तर एक वर्ग चक्क पोषण आहार शिजविल्या जाणार्‍या किचन शेडमध्ये भरविण्याचा प्रकार वाशिम तालुक्यातील माळेगाव जिल्हा परिषद शाळेत सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाशिम तालुक्यातील पांडव उमरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या माळेगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना ३ शिक्षकांकडून ज्ञानदान करण्यात येते. पूर्वी या शाळेत तीन वर्गखोल्या होत्या; परंतु यातील एक वर्गखोलीचे छत वार्‍या-वादळाने उडाले. त्यानंतर गेल्या  एक दीड वर्षापासून ही वर्गखोली त्याच स्थितीत असल्याने येथील चारही वर्ग दोनच खोल्यांमध्ये भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेष म्हणजे अपुर्‍या वर्गखोल्यांअभावी या शाळेतीला १ वर्ग कधी-कधी किचन शेडमध्ये भरविल्या जातो. त्यामुळे खिचडी शिजवताना विद्यार्थी बाहेर काढले जातात व विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रांगणात पोषण आहार घेतल्यानंतर  हे विद्यार्थी पुन्हा किचन शेडमध्ये  बसविले जातात. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याशिवाय शाळेच्या मध्यभागातूनच पांदन रस्ताही जातो. त्यामुळे गावकरी या शाळेला प्रवेशद्वारही बसवू देत नाहीत. या शाळेला अर्धवट कुंपणभिंत असून, उर्वरित बाजूला चक्क काट्यांचे कुंपण घातले आहे. या  शाळेची दुरुस्ती १४ व्या वित्त आयोगातून करण्यात यावी, असे ‘आपले गाव, आपला विकास’ या योजनेच्या  विकास आराखड्यामध्ये तरतूद केली असतानाही ग्रामपंचायतने शाळेची त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे  गावातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा आणि लोकवर्गणी किंवा दानाच्या माध्यमातून शाळेला जागा उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथे दोन वर्गखोल्यांचे काम युद्धपातळीवर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे. दरम्यान, या शाळेला दोन वर्ग खोल्या व पूर्ण कुंपणभिंत बांधण्याची मागणी उपसभापती मधुबाला सुभाष चौधरी यांच्यासह गावकर्‍यांनी केली आहे या मागणीकडेही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष झाले.  यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

अंगणवाडीची इमारतही अनेक दिवसांपासून शिकस्त माळेगाव येथील अंगणवाडी इमारतही गेल्या अनेक दिवसांपासून शिकस्त झाली असून, याच इमारतीच्या व्हरांड्यात अंगणवाडी भरविली जाते. येथे येणार्‍या चिमुकल्यांच्या भविष्याचा, आरोग्याचा आणि जिवाचा विचार करून ग्रामपंचायत प्रशासनाने येथे नवी अंगणवाडी इमारत ंउभारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, अशी मागणीही गावकरी वर्ग करीत आहे. 

 वादळी वार्‍यामुळे दुरवस्था झालेल्या वर्गखोलीबाबत वरिष्ठांना कळविले आहे, तसेच दुरुस्तीबाबत गतवर्षी ग्रामपंचायतच्या सभेत ‘आपले गाव आपला विकास’ आराखडा अंतर्गत नोंद केली आहे. - राधेश्याम गव्हाणे, मुख्याध्यापक, माळेगाव जि.प. शाळा

 या वर्गखोली दुरुस्ती तथा अंगणवाडी दुरुस्तीची मागणी आम्ही गावकर्‍यांच्यावतीने ‘आपले गाव आपला विकास’ आराखड्यामध्ये प्राधान्याने समाविष्ट केली; परंतु ती ग्रामपंचायतने अद्याप दखल घेतली नाही. - संतोष अवगण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष