कारंजा येथे वलाना ट्रॅक्टर शोरूमचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST2021-07-27T04:43:45+5:302021-07-27T04:43:45+5:30

कारंजा मंगरूळपीर मार्गावरील स्वस्तिकनगरात कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते राजू पाटील राजे यांच्या अध्यक्षतेखाली व ...

Launch of Valana Tractor Showroom at Karanja | कारंजा येथे वलाना ट्रॅक्टर शोरूमचा शुभारंभ

कारंजा येथे वलाना ट्रॅक्टर शोरूमचा शुभारंभ

कारंजा मंगरूळपीर मार्गावरील स्वस्तिकनगरात कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते राजू पाटील राजे यांच्या अध्यक्षतेखाली व एरिया सेल्स मॅनेजर नितेश गवंडकर, सर्व्हिस इंजिनिअर पंकज गिरनारे, सिनियर टेरिटरी मॅनेजर मोहन निकम व डेमोस्टेटर ज्ञानेश्वर कातडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वलाना ट्रॅक्टर्स शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचा जपानी तंत्रज्ञानाने निर्मित कुबोटा ट्रॅक्टर खरेदी करण्याची सोय झाली. आयोजित कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गोलेच्छा, नगराध्यक्ष शेषरावजी ढोके, उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पुवाले, जयकिशन राठोड, ललित चांडक, डाॅ. राजीव काळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे, दत्तापाटील तुरक, नंदकिशोर मुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज कानकिरड, सुभाष लळे, महिला आघाडी अध्यक्षा मीना काळे यांच्यासह शेखर पुंडकर, संतोष ठाकरे, गिते, ज्ञानेश्वर राजे, सुधाकर खडसे, श्याम इंगोले, विनोद, पुरुषोत्तम कव्हर, राहुल, गोलू आदींची उपस्थिती होती. संदीप काळे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार रवींद्र ठाकरे यांनी मानले.

Web Title: Launch of Valana Tractor Showroom at Karanja