शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी केंद्रांतर्फे पोषण अभियानास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:49 IST

सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती ...

सदर अभियानात ३० सप्टेंबरपर्यंत या पोषण अभियानामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी १ सप्टेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात आली. सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी पोषण आहार व पौष्टिक घटकांचे महत्त्व, परसबाग तयार करणे, स्तनदा व गर्भवती महिलांची तपासणी, कुपोषित बालकांचा शोध आदी उद्देशातून जिल्ह्यात संपूर्ण सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये १ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व अंगणवाडी सेविकांनी पोषण रॅली काढून आरोग्याविषयी विविध घोषवाक्ये रॅलीत देण्यात आली. तसेच यामध्ये वृक्षारोपण, आहार व आरोग्य याविषयी जनजागृती करण्यात आली. गरोदर माता, स्तनदा माता ० ते ६ वयोगटातील मुले यांना आहार, आरोग्य व त्यांच्या वजनाविषयी, स्वच्छतेविषयी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे आता १ ते ३० सप्टेंबर या एक महिन्याच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गरोदर, स्तनदा माता, सहा वर्षांपर्यंतची बालके यांच्या आहारात पोषणाचे महत्त्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रबोधन करणार आहेत. तसेच महिला व बालकल्याण विभागाचे प्रकल्प अधिकारी संजय जोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य सेविका राठोड मॅडम व गट समन्वयक अली सर यांच्या सहयोगाने ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रम अंगणवाडी स्तरावर राबविणार असल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. जनजागृती रॅलीदरम्यान वाशिम शहरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.