शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘ताे’ खड्डा बुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST

मोकाट गुरांचा बंदोबस्त करा मंगरूळपीर : शहरात ठिकठिकाणी मोकाट गुरांचा ठिय्या आहे, तसेच मोकाट गुरे ...

मोकाट गुरांचा बंदोबस्त करा

मंगरूळपीर : शहरात ठिकठिकाणी मोकाट गुरांचा ठिय्या आहे, तसेच मोकाट गुरे भररस्त्यावर बसने, रस्त्यावर वावरणे इत्यादी कारणांमुळे वाहतुकीस अडथळा येत असून, किरकोळ अपघात घडत आहेत, तसेच शहरात घाण होत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजप नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.

डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी

वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विविध वर्गांतील तज्ज्ञ डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी केली असून, ही पदे भरण्यात न आल्यास आंदाेलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

लाेककलावंतांना पॅकेज जाहीर करा

वाशिम : कोरोना काळात लोककलावंतांना रोजगाराचे कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोककलावंतांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महत्त्वाची कार्यालये भाड्याच्या खाेलीत

वाशिम : वाशिम तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा जलसंधारण, मातीपरीक्षण व मृदसंधारण कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. सुविधांयुक्त स्वतंत्र कार्यालय केव्हा मिळणार? अशी विचारणा कर्मचाऱ्यांमधून होत आहे. सद्य:स्थितीत जेथे कार्यालय आहेत तेथे अनेक अडचणींचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

वळणमार्गावर फलक उभारण्याची मागणी

वाशिम : मेडशी (ता. मालेगाव) येथून अकोल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा वळण मार्ग आहे. वाहने वळण घेत असताना समोरून येणारी वाहने सहजासहजी दिसत नाहीत. यामुळे दोन्हीकडून फलक असणे आवश्यक आहे. तो उभारण्यात यावा, अशी मागणी होत आहे. ही मागणी अनेक दिवसांपासून हाेत असताना संबंधितांकडून याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे.