जमिनीचा वाद; १६ जणांविरुद्ध गुन्हे

By Admin | Updated: October 7, 2015 02:22 IST2015-10-07T02:22:38+5:302015-10-07T02:22:38+5:30

मालेगाव तालुक्यातील प्रकारण.

Land dispute; Crime against 16 people | जमिनीचा वाद; १६ जणांविरुद्ध गुन्हे

जमिनीचा वाद; १६ जणांविरुद्ध गुन्हे

मालेगाव (जि. वाशिम): राजुरा येथील पुष्पा अनिल आढाव यांच्या अनसिंग शिवारातील शेतात जावून मारहाण केल्याप्रकरणी आनंदा राउत यांच्यासह इतर १६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पा आढाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या अनसिंग शेतशिवारामध्ये ४ ऑक्टोबर रोजी त्या आपल्या पतीसह शेतात गेल्या होत्या. सकाळी ९ वाजताच्या सुमारास आनंदा फकीरा राउत व त्यांचा मुलगा आणि इतर १६ जण शेतात आले. त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीव मारण्याची धमकी दिली तसेच आम्हा पतीपत्नीसह नातेवाइकांना कुर्‍हाडीच्या दांड्याने मारून जखमी केले तसेच माझ्या पुतणीजवळ असलेला मोबाइल हिसकला व तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारच्या फिर्यादीवरून पोलिसांनी १६ जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, ३९५, ३२३, ४४७, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला .

Web Title: Land dispute; Crime against 16 people