केकतउमरा ग्रामपंचायतीने घेतला तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीचा नियमबाह्य ठराव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:08 IST2017-11-22T19:03:23+5:302017-11-22T19:08:47+5:30
केकतउमरा येथील ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीचा घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याची तक्रार विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी जिल्हाधिका-यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे केली.

केकतउमरा ग्रामपंचायतीने घेतला तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीचा नियमबाह्य ठराव!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: तालुक्यातील केकतउमरा येथील ग्रामपंचायतीने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष निवडीचा घेतलेला ठराव नियमबाह्य असल्याची तक्रार विद्यमान तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रविण पट्टेबहादूर यांनी जिल्हाधिका-यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांकडे २२ नोव्हेंबर रोजी केली.
निवेदनात नमूद आहे की, शासन निर्णयानुसार तंटामुक्त अध्यक्ष निवडीबाबत १५ आॅगस्ट ते ३१ आॅगस्ट यादरम्यान सभा होणे आवश्यक होते. मात्र, ही सभा चक्क १० नोव्हेंबरला घेण्यात आली. यासंदर्भात १७ आॅक्टोबर रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित करुन सदर विषयाची वस्तुस्थिती तपासून नियमानुसार कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकाºयांच्या पत्रात नमूद आहे. असे असताना केकतउमरा ग्रामपंचायतने ग्रामसभा घेवून नविन अध्यक्षाची निवड केली. ही निवड शासन निर्णयानुसार नसून नियमबाह्य आहे. त्याचबरोबर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी देखील ही निवड नियमबाहय असल्याचा खुलासा करत त्यांनी या विषयावर तंटामुक्त समितीच्या जिल्हासचिवांचे मार्गदर्शन मागविले आहे. या सर्व बाबी पाहता ग्राम केकतउमरा येथे झालेली तंटामुक्त समितीची सभा नियमबाह्य असून शासननिर्णयाला बगल देणारी असल्याचा आरोप केला आहे.