शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

आलेगावात साडेचार लाखांचा मोह साठा जप्त्र

By admin | Updated: November 22, 2014 02:11 IST

ट्रक, बोलेरो व्हॅनसह १७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात : तिघांना अटक.

चान्नी/आलेगाव (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या आलेगाव येथे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे छापा टाकून गावठी दारू गाळण्यासाठी उपयोगात येणार्‍या मोह फुलांचा साडेचार लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी एकूण १७ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तीन आरोपींना अटक केली. पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, आलेगाव येथील निर्गृणा नदीच्या काठावरील वाडकेश्‍वर मंदिरालगत मोह फुलांचा मोठा साठा उतरविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी एम.पी. 0४ एच.ई. 0१३८ मधून मोह फुलांचे कट्टे एम.एच. ३0 एबी ७२ व एम.एच. ३0 एल ३२३८ क्रमांकाच्या दोन बोलेरो व्हॅनमध्ये भरल्या जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच ट्रक चालक पळून गेला. तथापि, अब्दुल माजीद शे. कासम, अब्दुल निसार अब्दुल नबी व शे. वाजीद शे. सलीम तिघेही रा. आलेगाव यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी ट्रकमधील ११0 क्विंटल मोह फुलांचा साठा (किंमत ४,३८,२४0), ट्रक (किंमत ७ लाख ५0 हजार), दोन बोलेरो व्हॅन (किंमत ५ लाख), मोटारसायकल (२५ हजार), २ मोबाईल (३ हजार), असा एकूण १७ लाख १६ हजार २४0 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तीन आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा ६१ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक जाधव, बापूराव चव्हाण, अनिल राठोड, शेख अन्सार, इरफान अली, संदीप तराळे यांनी ही कारवाई केली.