नुकसानग्रस्त भागाची पाहणी
By Admin | Updated: March 3, 2015 01:37 IST2015-03-03T01:37:39+5:302015-03-03T01:37:39+5:30
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस : मदतीची आशा धूसर.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी
वाशिम : वादळी व अवकाळी पावसाने जिल्हय़ातील फळबागेसह गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून, नुकसानग्रस्त भागाची पाहणी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने केली असून, काही भागाची पाहणी सुरू आहे. पाहणीत किरकोळ स्वरूपाचे नुकसान असल्याने शेतकर्यांना मदत मिळण्याची अपेक्षा धूसर झाली आहे. वाशिम जिल्हय़ात २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी वादळ, वारा, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. वादळामुळे शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला. संत्राबागेतील मृग बहराची संत्री झडली. ज्या भागाची पाहणी समितीने केली याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हाधिकरी यांना कळविली.