शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणाच्या उल्लंघनामुळे वाढतेय कन्टेेेेनमेंट झोनची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:41 IST

जिल्ह्यात १६७ : ग्रामस्तर समितीचे लक्ष वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कठोर ...

जिल्ह्यात १६७ : ग्रामस्तर समितीचे लक्ष

वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. हा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात असून, कोरोना बाधित रुग्णांचा इतरांशी संपर्क येऊ नये म्हणून बाधितांच्या घरालगतचा परिसर ‘कन्टेनमेंट झोन’ जाहीर केला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६७ कन्टेनमेंट झोन तयार झाले आहेत. कोरोना संसर्गासह कन्टेनमेंट झोनही वाढत असल्याने या सर्व ठिकाणावर लक्ष ठेवताना प्रशासनासह ग्रामस्तर कोरोना दक्षता समितीचीही दमछाक होत आहे.

जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ६६६३ लोकांना कोरोना संसर्ग झाला होता. ही संख्या १८ मार्च रोजी ११८९२ वर पोहोचली. अर्थात गत अडीच महिन्यांत ५२२९ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे.यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी वेगवेगळ्या कठोर उपाययोजनाही केल्या जात आहेत. त्यात कोरोना बाधितांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात येत असताना त्याचे पालन पूर्णपणे होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात आहे. शिवाय बाधितांच्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. गंभीर लक्षणे नसलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवले जात असले तरी, त्यांचा इतरांशी संपर्क होऊ नये आणि त्यांनी दक्षता बाळगावी म्हणून बाधितांच्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोन जाहीर केला जात आहे. यामुळे कन्टेनमेंट झोनची संख्या वाढत असल्याने एकाच वेळी सर्व ठिकाणी लक्ष ठेवताना ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीसह प्रशासनाची दमछाक होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १६७ कन्टेनमेंट झोन झाले आहेत.

------------------------

पोलिसांची पेट्रोलिंग

वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बाधितांच्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये टाकला जात आहे. लॉकडाऊनच्या काळाच्या तुलनेत आता कन्टेनमेंट झोनचा परिसर कमी झाला आहे. शिवाय या ठिकाणी नियमित पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविकांना ठेवले जात नाही; परंतु नियमांचे पालन होत आहे की नाही, त्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित भागातील बिट जमादारांना त्यांच्या सहकाऱ्यासह या ठिकाणी दिवसातून किमान तीन वेळा फेरी मारावी लागते.

------------------------

धनज बु. येथे सर्वाधिक ‘कन्टेनमेंट झोन’

जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही ग्रामीण भागात जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या धनज बु. येथे गत दीड महिन्यात कोरोना संसर्गाचा कहरच होत आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी येथे व्यापक उपाययोजना केल्या जात असून, त्यात ३२ बाधित व्यक्तींच्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोनमध्ये टाकण्यात आला आहे. जिल्ह्यातील इतर गावांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

------------------------

तालुका निहाय कन्टेनमेंट झोन

तालुका कन्टेनमेंट झोन

वाशिम ६१

मालेगाव ३९

मं.पीर १७

कारंजा ४२

रिसोड ०६

^^^^^^^^^