शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने कोसळले घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

गेल्या सहा दिवसांपासून धनज बु.सह परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच धनज बु. येथे ...

गेल्या सहा दिवसांपासून धनज बु.सह परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच धनज बु. येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस पडला. पावसाचे पाणी घराच्या भिंतीत मुरले. त्यामुळे गावातील सुनील डफडे यांच्या घराची एक भिंत काेसळली. यावेळी सुनील डफडे यांचा परिवार झोपेत होता. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तथापि, या घटनेत घरातील टी व्ही, कपाट, सहा हजार रुपये किमतीचा किराणा पूर्णपणे या भिंतीखाली दबला. तसेच शेजारीच असलेल्या दीपक डफडे यांच्या घरातील शौचालय व स्नानगृहसुद्धा या पावसामुळे पडले. जोरदार पावसाने डफडे परिवाराचे नुकसान झाले असून, प्रशासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सुनील डफडे व दीपक डफडे यांनी केली आहे.

०००००००

सहा दिवसांपूर्वी काजळेश्वरात कोसळली दोन घरे

काजळेश्वर : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विटा, मातीच्या घरांची पडझड होत आहे. कारंजा तालुक्यात आठवडाभरात अशा दोन घटना घडल्या. त्यात काजळेश्वर येथील बंजारा वस्तीतील दोन घरांची सोमवारी रात्री पडझड झाली. सुदैवाने त्यातही कोणाला दुखापत झाली नाही. बंजारा वस्तीतील प्रल्हाद मनिराम पवार यांच्या घरांची भिंत पडली, तसेच तांडा वस्तीतील गणेश विष्णू राठोड यांच्याही घराची भिंत पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले.