शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने मोडले ऊस उत्पादकांचे कंबरडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० ...

जिल्ह्यात सोमवार ६ सप्टेंबर ते मंगळवार ७ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ४७.७० मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक ५५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून त्यांची शेतजमीन पिकांसह खरडून गेली. त्यात तपोवन येथील परिपक्वतेच्या अवस्थेत असलेले उसाचे पीकही जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तथापि, या नुकसानीची पाहणी व पंचनामे स्थानिक प्रशासनाने केले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना ११ सप्टेंबर रोजी निवेदन पाठवून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. पंकज लक्ष्मणराव येवले, रवींद्र कोंडुजी सावध, मुरलीधर महादेव येवले, शरद भानुदास येवले, स्वप्नील दिलीप येवले, गणेश सोपानराव येवले, गजानन लक्ष्मण येवले या सात शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.

००००००००००००००००००

उत्पादनाची आशाच नाही

सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे उसाच्या पिकाला तडाखा बसून, संपूर्ण पीक मोडून जमिनीवर पडले. आता हे पीक उभे होण्याची कुठलीच शाश्वती नसल्याने या पिकापासून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांना राहिली नाही.

००००००००००००००००००

पाच दिवस उलटूनही दखल नाही

तपोवन येथे सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. यात ऊस पिकाचाही समावेश आहे. तथापि, पाच दिवस उलटून गेले तरी या पिकाचे पंचनामे करण्याची तसदी महसूल किंवा कृषी विभागाने घेतली नाही.

००००००००००००००००००

कोट : सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे आमच्या शेतातील ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संपूर्ण पीक मोडून पडले आहे. त्यामुळे यातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नसल्याने प्रशासनाकडून पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.

-शरद येवले,

ऊस उत्पादक शेतकरी,

००००००००००००००००००

कोट : मुसळधार पावसामुळे दीड एकर क्षेत्रातील उसाचे पीक पूर्णपणे कोलमडून पडले. आता या पिकातून कवडीचेही उत्पन्न मिळण्याची आशा राहिली नाही. त्यामुळे या पिकावर केलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यातच गेला असून, आर्थिक संकट आमच्या कोसळले. तेव्हा आम्हाला आर्थिक मदत मिळावी.

--रवींद्र सावध,

ऊस उत्पादक शेतकरी