शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान टाळण्यासाठी हिरव्या उडिद पिकाची तोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 16:33 IST

उडिदाची हिरवी झाडेच उपटून शेंगा तोडत असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात पाहायला मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क राजुरा (वाशिम) : गेल्या आठ तेदहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने काढणीवर आलेले उडिदाचे पीक संकटात सापडले आहे. उडिदाच्या शेंगा परिपक्व होऊन सुकल्या असतानाही पावसामुळे झाडे हिरवीच असून, पावसामुळे काढणीच्या कामात खोळंबा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी उडिदाची हिरवी झाडेच उपटून शेंगा तोडत असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शेतकºयांच्या खर्चातही वाढ झाली आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस विलंबाने दाखल झाला. त्याचा परिणाम उडिद, मुगाच्या क्षेत्रावर झाला. मुगाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ७९१ असताना केवळ ६३९० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली, तर उडिदाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ९२५ हेक्टर असताना केवळ ८३२८ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके कमी कालावधीची आणि शेतकºयांना आधार देणारी आहेत. आता ही पिके काढणीवर आली आहेत. पिकाच्या शेंगा परिपक्व होऊन सुकल्या आहेत. त्यामुळे त्या शेंगांची तोडणी करणे आवश्यक आहे. तथापि, सततच्या पावसामुळे उडिद, मुगाची झाडे अद्यापही हिरवीच आहेत. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतात शेंगा तोडणीचे काम करणे कठीण झाले आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातही गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. उडिद पिकाच्या शेंगा सुकल्या असल्या तरी पावसामुळे  पिकाचा पाला हिरवाकच्च आहे. आता शेंगा तोडल्या नाही, तर त्या पावसामुळे फुटण्याची, तसेच शेतमालाचा दर्जा खालावण्याची भिती आहे. त्यातच पावसामुळे उडिदाच्या पिकाची सोंगणी अशक्य असल्याने शेतकरी झाडे उपटून रस्त्यावर बसून शेंगा तोडणी करीत आहेत. हा प्रकार मोठा खर्चिक असल्याने उडिद उत्पादक शेतकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. तथापि, नुकसान टाळण्यासाठी हा प्रकार करण्याशिवाय शेतकºयांकडे पर्यायही उरलेला नाही. 

उडिदाचे पिक काढणीला आले  पावसामुळे पाला हिरवा तर शेंगा वाळलेल्या आहेत त्यामुळे सोंगणी अशक्य आहे  हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून मजुरा व्दारा झाडे उपटून रोडवर शेंगा तोडणी करावी  लागत आहे मजुरीचा खर्च परवडणारा नाही उडीद पेरुन पश्र्चाताप होत आहे.-संजय श्रीराम चव्हाण शेतकरी सुदी (मालेगाव)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी