शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना डावलले

By admin | Updated: June 28, 2014 01:41 IST

वाशिम तहसिलदारांना निवेदन : दोषींवर कारवाईची मागणी.

कोंडाळा महाली : येथे मार्च २0१४ मध्ये झालेल्या गारपीटीने गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. परंतु संबंधितांनी गारपीटग्रस्तांची सदोष यादी बनवून सदोष अहवाल सादर केला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी वंचित राहिल्याचा आरोप २३ जुन रोजी वाशिम तहसिलदार आशिष बिजवल यांना दिलेल्या निवेदनामध्ये वंचित गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी केला आहे.
गारपीटग्रस्तांच्या यादीमध्ये जे खरोखरच नुकसानग्रस्त लाभार्थी आहेत त्यांची नावे वगळून ज्या कास्तकारांच्या शेतामध्ये गहू, हरभरा नसताना सुद्धा त्यांचे नाव सदर यादीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे मुलत: ज्या कास्तकारांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांना गारपीटग्रस्त म्हणून मिळणार्‍या मोबदल्यापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. तांदळी शेवई येथेदेखील अनेक पात्र शेतकर्‍यांना भरपाईपासून डावलण्यात आले आहे. शेतकर्‍यांनी यापूर्वी तहसील प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही.
याबाबत चौकशी करुन संबंधित दोषींवर कार्यवाही करण्यात यावी आणि वंचित गारपीटग्रस्तांना त्याचा मोबदला देण्यात यावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सदस्य राहुल तुपसांडे, भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाउ भिसे आणि ३४ गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी सहीनिशी तहसिलदार वाशिम यांच्याकडे केली आहे. याबाबत तहसिलदार आशिष बिजवल यांना विचारणा केली असता मंडळ अधिकारी यांना विचारुन चौकशी केली जाईल असे सांगितले.