शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता रॅलीद्वारे ग्रामसफाईचा संदेश!

By admin | Updated: February 16, 2016 01:29 IST

दुघोरा येथील उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांंचा उत्स्फूर्त सहभाग.

उंबर्डाबाजार (वाशिम): स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत दुघोरा येथील ग्रामपंचायत प्रशासन तथा जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी गावातून स्वच्छतारॅली काढून गावकर्‍यांना ग्रामसफाईचा संदेश देण्यात आला. दुघोरा ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छतेसंबंधीचे विविध उपक्रम राबविले जात असून या गावाची हगणदारीमुक्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरु आहे. गावकर्‍यांनी शौचालय बांधण्याच्या कामासाठी पुढाकार घेण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने गावात शनिवारी स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. रॅलीतील विद्यार्थ्यांंच्या स्वच्छताविषयक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीचा समारोप जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी सरपंच मीराबाई पुंड, उपसरपंच दिलीप भगत, ग्रामपंचायत सदस्य अनिता बांडे, तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष सावके, पोलिस पाटील चाटे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक एस.सी. वंजारे यांनी केले. स्वच्छता रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक खंडारे, राऊत, रिठे, बोरगडे, चौधरी, डेरे आदिंनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास विद्यार्थ्यांंसह ग्रामस्थांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक एस.सी.वंजारे यांनी करुन आभार मानले.