शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Gram Panchayat Election Results : नवख्यांना संधी, प्रस्थापितांना नाकारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 12:07 IST

Gram Panchayat Election Results : ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर करीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच हादरा दिला. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना नाकारत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्तांतर करीत सत्ताधाऱ्यांना चांगलाच हादरा दिला. जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा एकूण १६३ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी ३२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १५ जानेवारी रोजी एकूण ५३९ केंद्रांत दोन लाख ८८ हजार ६९१ पैकी दोन लाख १९ हजार ३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरीय सहा केंद्रांत मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालाने अनेक दिग्गजांना हादरा देत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. काही दिग्गजांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढत ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली. 

या दिग्गजांच्या पॅनलचा पराभव कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिलीपराव सरनाईक यांच्या पॅनलला चिखली गावात नऊ पैकी तीन जागेवर समाधान मानावे लागले. शिरपूर येथे जि.प. उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, चिवरा येथे आमदार अमित झनक यांचे खंदे समर्थक सुरेश शिंदे, अनसिंग येथे जि.प. सदस्य पांडुरंग ठाकरे, धामणी मानोरा येथे माजी जि.प. सभापती हेमेंद्र ठाकरे, इंझोरी येथे जि.प. सदस्य विनाताई जयस्वाल, वाईगौळ येथे शिवसेना संपर्कप्रमुख भोला राठोड, कुपटा येथे पंचायत समिती माजी उपसभापती अब्दुल बशीर, तळप बु.येथे भाजपचे नेते नीलकंठ पाटील, कोंडोली येथे बाजार समिती  माजी सभापती अशोकराव देशमुख यांच्या गटाला पराभवाला सामोरे जावे लागले. 

या दिग्गजांच्या पॅनलचा विजय मांगूळझनक येथे आमदार अमित झनक यांचे काका पंडितराव झनक यांच्या गटाने नऊ पैकी नऊ जागा पटकावित प्रतिस्पर्धी गटाचा धुव्वा उडविला. चिखली येथे जि.प. सदस्य स्वप्निल सरनाईक यांच्या पॅनलने नऊ पैकी सहा जागा पटकावत सत्तांतर घडवून आणले. वाकद येथे माजी जि.प. सदस्य रावसाहेब देशमुख व जि.प. सदस्य सुजाता देशमुख, सवड येथे माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन लाटे, कवठा येथे पं.स. सभापती गीता संजय हरिमकर, पळसखेडा येथे पं.स. उपसभापती सुभाष खरात, कंकरवाडी येथे माजी जि.प. सभापती विश्वनाथ सानप, शेलूबाजार येथे सुरेशचंद्र कर्नावट, काटा येथे माजी पं.स. सभापती वीरेंद्र देशमुख, शिरपूर येथे अशोक अंभोरे, मेडशी येथे शेख गणीभाई, वसारी येथे जि.प. सदस्य बेबीताई इंगोले आदींच्या गटाचा विजय झाला. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकwashimवाशिमPoliticsराजकारण