शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अग्नी, विद्युत सुरक्षेचे अंकेक्षण लालफीतशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:18 IST

वाशिम : विदर्भातील भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला ९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून ...

वाशिम : विदर्भातील भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला ९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागून १० निष्पाप चिमुकल्यांचा प्राण गेले. या हृदयद्रावक घटनेने शासकीय रुग्णालयांकडून अग्नी व विद्युत सुरक्षेबाबत बाळगण्यात येत असलेली उदासीनता चव्हाट्यावर आली. दरम्यान, सुरक्षेची खबरदारी म्हणून अग्नी व विद्युत सुरक्षेचे तत्काळ अंकेक्षण करून घेण्यासंबंधी शासनाने आदेश दिले; मात्र घटनेला २५ दिवस उलटूनही जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी हा आदेश पाळलेला नाही. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाचाही पाठपुरावा कमी पडल्याचे दिसून येत आहे.

भंडारा येथील अग्निकांडाच्या पार्श्वभूमीवर खासगी व शासकीय रुग्णालयांमधील फायर, इलेक्ट्रिक ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला. जिल्ह्यात नोंदणीकृत २०० खासगी रुग्णालये असून त्यातील १२४ रुग्णालये एकट्या वाशिम शहरात वसलेली आहेत. यासह एक जिल्हा सामान्य रुग्णालय, एक उपजिल्हा रुग्णालय, ७ ग्रामीण रुग्णालये, २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५३ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित आहेत. यातील बहुतांश रुग्णालयांनी दोन्ही प्रकारचे ऑडिट अनेक वर्षांपासून केलेले नव्हते. त्यावर बराच गदारोळ झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लेखी आदेश काढून खासगी व शासकीय रुग्णालयांनी विनाविलंब फायर, इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याचे आदेश काढले; मात्र जिल्ह्यातील ९० टक्के रुग्णालयांनी हा आदेश पायदळी तुडविला असून ऑडिटबाबत उदासीनता बाळगल्याचे उघड झाले आहे.

....................

जिल्ह्यात नोंदणीकृत खासगी रुग्णालये

२००

जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये

०२

प्राथमिक आरोग्य केंद्र

२५

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र

१५३

ग्रामीण रुग्णालये

०७

...........................

कोट :

जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांनी विनाविलंब फायर व इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या; मात्र अनेक रुग्णालयांनी अंकेक्षण अहवाल प्रशासनाकडे सादर केलेला नाही. यासंबंधी मध्यंतरी प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडला असला तरी या विषयाकडे विशेष लक्ष पुरविले जाईल.

- शैलेश हिंगे

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

.............

कोट :

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अग्निसुरक्षेचे अंकेक्षण करून घेण्यासंबंधी धानोरा खु. येथील एजन्सीकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. येत्या तीन दिवसांत हे काम सुरू होणार आहे.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम