शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अनुकंपा उमेदवारांच्या पदभरतीचा निघाला मुहूर्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST

गत काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती बंद असल्याने पात्र उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत होता. यासंदर्भात अनुकंपाधारक संघटनेने जिल्हा परिषद, ...

गत काही वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती बंद असल्याने पात्र उमेदवारांमधून नाराजीचा सूर उमटत होता. यासंदर्भात अनुकंपाधारक संघटनेने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध टप्प्यांत आंदोलनही केले होते. आता जिल्हा परिषदेने अनुकंपा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर केल्याने अनुकंपा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेंंतर्गत विविध विभागांतील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यासाठी डिसेंबर महिन्यात कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी प्रतीक्षा यादीनुसार तात्पुरती निवड यादी तयार केली असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर तसेच सामान्य प्रशासन विभागामध्ये निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनुकंपा प्रतीक्षा यादीमधील कर्मचाऱ्याच्या पात्र नियुक्ती, निवडीबाबत कुणाचे आक्षेप असल्यास त्यांना १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात आवश्यक त्या दस्तऐवजासह जिल्हा परिषदेत आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. या आक्षेपाबाबत निराकरण करून नियमानुसार पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याची पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांनी सांगितले.