शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाच अधिका-यांसह १९ बसचालकांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: October 7, 2015 01:57 IST

खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक, आस्थापना अधिकारीसह दोन वैद्यकीय अधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात २0 चालकांनी नजरेमध्ये दोष असल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून चालक पदावरून सुरक्षारक्षक (वॉचमनची) पदावर नोकरी मिळविली होती; मात्र सादर केलेले हे वैद्यकीय प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्यामुळे अमरावती विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी कृष्णकांत कुमरे यांच्या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी पाच अधिकार्‍यांसह १९ बसचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे या पाच अधिकार्‍यांमध्ये नवृत्त एसटीबस विभागनियंत्रक चंद्रकांत बोरसे, तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शिवाजी गजरे, डॉ. अशोक हिवाळे, बुलडाणा एसटीबस आगारातील डॉ.चवरे व आस्थापना अधिकारी सुभाष धोंडू पाटील यांचा समावेश आहे. याप्रकरणी लोकमतने २६ सप्टेंबर २0१५ रोजी हॅलो १ पानावर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. मागील २0१३-१४ मध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागात डोळ्यात रंग आंधळेपणा असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र महामंडळाला सादर करून एकाच वेळी तब्बल १९ चालकांनी सुरक्षा रक्षक या पदावर आपली सेवा करून घेतली होती. हे करीत असताना महामंडळाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून संबंधित अधिकार्‍यांना हाताशी धरून हा प्रकार घडला होता. या प्रकरणाच्या तक्रारी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून चौकशी सुरू झाली. या १९ कर्मचार्‍यांची पुन्हा सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांकडून डोळ्याची तपासणी करण्यात आली असता, त्यांच्या डोळ्यात कोणत्याही प्रकारचा नजरेचा दोष आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून चालक पदावरून सुरक्षा रक्षक पदावर नोकरी मिळविल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत चौकशीसुद्धा झाली. मागील एक वर्षापासून सुरू असलेले हे प्रकरण अंतिम टप्प्यात असताना या कर्मचार्‍यांना कोणत्या डॉक्टरांनी नजरेचे सदोष वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. याशिवाय नियमाचे पालन न करता आणि वरिष्ठांची परवानगी न घेता कोणत्या आधारावर तत्कालीन अधिकार्‍यांनी या १९ चालकांना तडकाफडकी चालक पदावरून सुरक्षा रक्षक पदावर आदेश दिले? याची एसटीच्या सुरक्षा विभागाने सखोल चौकशी केली असता, सदर प्रकरण उघडकीस आले. यामुळे अमरावती विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी कृष्णकांत कुमरे यांच्या तक्रारीवरून आज १९ चालकांसह पाच अधिकार्‍यांवर बुलडाणा शहर पोलिसात भांदविच्या ४२0, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.