शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खत, बियाण्यांची दरवाढ; लागवड खर्च वाढणार!

By admin | Updated: June 14, 2016 02:11 IST

शेत मशागतीची कामे पूर्ण : खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकरी सज्ज.

सुनील काकडे / वाशिमगेल्या तीन वर्षांंपासून सततचा दुष्काळ सहन करीत असणार्‍या शेतकर्‍यांना किमान यंदा तरी दमदार पाऊस होऊन जोमदार उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा लागून आहे. दरम्यान, जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी शेतमशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेतकरी खरिपातील पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे खत, बी-बियाणे यासह रासायनिक औषधीचे दर वाढल्याने यंदा लागवड खर्चातदेखील वाढ होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.वाशिम जिल्ह्यात नगदी आणि हमखास पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनला शेतकर्‍यांची प्रथम पसंती आहे. सोयाबीनचे कोठार म्हणून ओळख मिळविलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातही सोयाबीनचाच विक्रमी पेरा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. दरम्यान, गेल्या तीन वर्षाचा पाऊस, पीकपेरा आणि हाती आलेल्या प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार केल्यास निसर्गाचा लहरीपणा, पावसातील अनियमितता आदी कारणांमुळे शेतकर्‍यांच्या पदरी केवळ निराशाच पडल्याचे दिसून येते. खरीप आणि त्यापाठोपाठ रब्बी हंगामातही खासगी तथा बँकांकडून कर्ज उचलणार्‍या शेतकर्‍यांना किमान लागवड खर्चाइतकेही उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. असे असताना झाले गेले विसरून शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने २0१६ च्या खरीप हंगामाला सामोरे जात आहे. मात्र, यंदाही मृग नक्षत्र सुरू होऊन ५ दिवस उलटल्यानंतरही मोठय़ा पावसाची हजेरी अद्याप लागलेली नाही. दुसरीकडे शेत मशागतीपासून बी-बियाणे, खत, रासायनिक औषधीचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत. सध्या शेतकर्‍यांना प्रती ३0 किलोच्या सोयाबीन बियाणे बॅगसाठी २४00 रुपये मोजावे लागत आहेत; तर खताची एक बॅग किमान हजार रुपयाला मिळत आहे. याशिवाय काडीकचरा वेचणे, नांगरण, वखरण आदी शेतमशागतीच्या कामांसाठी एकरी सुमारे ५ ते ६ हजार रुपये खर्च लागलेला आहे. तथापि, पावसाने किमान यंदातरी अपेक्षित साथ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.