Farmer's suicide in Bhoyani village of Washim district | भोयणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
भोयणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

मानोरा : तालुक्यातील भोयनी येथील शेतकऱ्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाचे नुकसान पाहून  शेतातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १० नोव्हेंबरच्या रात्री दरम्यान घडली. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी मर्ग दाखल केला आहे.
भोयनी येथील ३९ वर्षिय शेतकरी राजेश रामजी चव्हाण  यांचेकडे आईच्या नावे तीन एकर शेती आहे . गेल्या पंधरा दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतजमिनीतला शेतमाल शेतातच सडला.  झालेल्या नुकसानामुळे आगामी नियोजन  कसे करावे या विंवचनेत असलेले राजेश यांनी आत्महत्या केली. त्यांच्यावर खासगी कर्जासह जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अकोला यांचे कर्ज आहे. शेतजमिन त्यांच्या आई शारदाबाई रामजी चव्हाण यांचे नावे आहे ते आईसोबत राहत होते . याप्रकरणी मनोहर रामजी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी मर्ग दाखल केला.

Web Title: Farmer's suicide in Bhoyani village of Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.