शेतकरीपुत्राची आत्महत्या

By Admin | Updated: September 21, 2015 01:57 IST2015-09-21T00:06:49+5:302015-09-21T01:57:02+5:30

सततच्या नापिकीला कंटाळललेल्या शेतकरी पुत्राने प्राशले विष.

Farmer's son suicide | शेतकरीपुत्राची आत्महत्या

शेतकरीपुत्राची आत्महत्या

भामदेवी (जि. वाशिम): सततच्या नापिकीला कंटाळललेल्या युवा शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार १९ सप्टेंबरच्या रात्री कारंजा तालुक्यातील मेहा येथे घडली. अरविंद रामदास तंतरपांडे (३२), असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. अरविंद तंतरपांडे यांच्याकडे वडिलाच्या नावे असलेली ३ एकर शेती आहे. त्यातच गत दोन वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे शेतीमधून कोणतेच उत्पन्न झाले नाही, तसेच यंदाही दुष्काळामुळे खरीपाची पिके सुकून गेल्याने अरविंद सतत चिंतेत राहायचा. या चिंतेमुळेच त्याने शनिवार १९ सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्‍चात म्हातारे आई-वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: Farmer's son suicide