मानधन योजनेत नाव नोंदणी मोहिमेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 03:24 PM2019-08-24T15:24:27+5:302019-08-24T15:24:34+5:30

गावनिहाय विशेष शिबिरास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी शेतकºयांनी नाव नोंदणी करण्याकरिता सामायिक सुविधा केंद्रांवर तोबा गर्दी झाली.

Farmers' Response to Name Registration Campaign in PM farmer honorium Scheme | मानधन योजनेत नाव नोंदणी मोहिमेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

मानधन योजनेत नाव नोंदणी मोहिमेस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभावी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत गुरूवारपासून गावनिहाय विशेष शिबिरास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी शेतकºयांनी नाव नोंदणी करण्याकरिता सामायिक सुविधा केंद्रांवर तोबा गर्दी झाली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.
शेतकºयांच्या सुरक्षित भवितव्यासाठी अंमलात आलेल्या या योजनेमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील २ हेक्टरर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकºयांना सहभाग घेता येणार आहे. वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. यादरम्यान लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची देखील तरतुद या योजनेत आहे. १ आॅगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे वय असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असून त्यांना वयानुसार प्रतिमाह ५५ ते २०० रुपये रक्कम जमा करावी लागेल. सदर रक्कम ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. यात केंद्र शासनाकडून सुद्धा रक्कम जमा करण्यात येईल. नोंदणीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून लाभार्थी हिश्याची रक्कम आॅटो-डेबीटने विमा कंपनीकडे जमा होणार आहे.
दरम्यान, या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले होते. तसेच या शिबिराला संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार, गुरूवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थी शेतकºयांची नोंदणी करण्यात आली.
 


प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये सहभागी होता यावे, याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. २३ ते २५ आॅगस्टदरम्यान गाव पातळीवर नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र शेतकºयांनी या योजनेसाठी नाव नोंदवावे.
- ऋषीकेश मोडक
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: Farmers' Response to Name Registration Campaign in PM farmer honorium Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.