शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

सिंचनासाठी पाण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्रांचे सोनल प्रकल्पामध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 5:27 PM

शेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार ( वाशिम ) : या वर्षी सोनल प्रकल्पात बऱ्यापेकी जलसाठा असूनही सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. दरम्यान सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी पूत्रांनी १९ नोव्हेंबर रोजी सोनल प्रकल्पामध्येच आंदोलन पुकारले आहे.सिंचनासंदर्भात जिल्हाधिकारी मिश्रा यांना निवेदन ही दिले होते. मात्र अद्याप पर्यंत रब्बी पिकांसाठी पाणी सोडले नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोनल प्रकल्पात बसून आंदोलन केले. सोनल प्रकल्पातून शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी सोनल प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या शेतकरी व शेतकरी पुत्रांनी आंदोलना दरम्यान आपली मागणी लावुन धरली.कालव्याची डागडूगी करून  १९ नोव्हेंबर रोजी पाणी सोडावे अन्यथा धरणात बसून आंदोलन करू असा इशारा शेतकरी पुत्रांनी ३० आँक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिला होता. तरीही प्रशासनाने कालव्याची पुर्णपणे डागडूजी करून पाणी सोडले नाही.म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पाण्याअभावी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकापासून आवश्यक तेवढे उत्पन्न मिळाले  नाही. रब्बी हंगामात पाण्याअभावी शेतकऱ्यांचे नूकसान होऊ नये यासाठी परिसरातील शेतकरी, शेतकरी पुत्रांनी कालवे दुरूस्त करून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडावे अशी मागणी केली होती. परंतू प्रशासनाने याची दखल घेतली नाही. सद्यस्थितीत सोनल प्रकल्पात १०० टक्के पाणी उपलब्ध आहे.परंतू संबंधित प्रशासनाचे नियोजन नसल्यामूळे शेतकऱ्यांवर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आलेली आहे. हरभरा,गहू पेरण्याची शेतकऱ्यांनी तयारी केलेली आहे.परंतू पाणी उपलब्ध नसल्यामूळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व शेतकऱ्यांना उपसा सिंचन करण्यास परवानगी द्यावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी अर्जुन सुर्वे, संतोष राऊत, मारोती पाचे, मारोतराव राऊत, श्रीधर राऊत, रत्नदिप राऊत, गौरव राऊत, नंदूभाऊ येवले, राजकुमार येवले, पवन मुखमाले, गजानन सुर्वे,  संजय मुखमाले, तुळशीराम कस्टे ,हरिदास वाढणकर, शरद सुर्वे, प्रविण सुर्वे, हरिष सुर्वे, मंगेश सुर्वे, घनश्याम सुर्वे, शुभम सुर्वे. यांची उपस्तिथी होती.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलनFarmerशेतकरी