शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कृषिसेवा केंद्रात झळकले फलक!

By admin | Updated: June 9, 2016 02:31 IST

फलक नसल्यास कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश; लोकमत स्टिंगची दखल शेतक-यांना दिलासा.

वाशिम: रासायनिक खते व बी-बियाण्याच्या किमतीचे दरपत्रक न लावता जिल्ह्यातील अनेक कृषिसेवा केंद्रं शेतकर्‍यांची कशी लूट करीत आहेत, याचे वास्तव ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनने समोर आणताच कृषी विभागात एकच धावपळ सुरू झाली. सोमवार व मंगळवारी जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांची तपासणी करून माहितीदर्शक फलक लावण्याचे निर्देश दिले. वाशिम शहरातील कृषिसेवा केंद्रांमध्ये आता माहितीदर्शक फलक झळकत आहेत. पेरणीसाठी विविध प्रकारची खते, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू झाली आहे. खते व बियाण्याच्या छापील किमती व शासकीय किमती, यामध्ये थोडीफार तफावत असल्याने शेतकर्‍यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पृष्ठभूमीवर संबंधित कृषिसेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासकीय किमतीचे दरपत्रक, उपलब्ध साठा, तक्रारपेटी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा सूचनाही जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने सर्व कृषिसेवा केंद्रांना दिलेल्या आहेत. तथापि, काही कृषिसेवा केंद्रांनी माहितीदर्शक फलक न लावल्याने शेतकर्‍यांची आर्थिक लूट होण्याची शक्यता बळावली होती. यासंदर्भात ५ जून रोजी ह्यलोकमतह्ण चमूने प्रातिनिधीक स्वरूपात वाशिम शहरातील दहा कृषिसेवा केंद्रांची पाहणी केली असता, आठ दुकानांमध्ये रासायनिक खते व बी-बियाण्यांचे दरपत्रक व उपलब्ध साठा दर्शविणारे अद्ययावत फलक आढळून आले नव्हते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच, कृषी विभागाने वाशिम शहरासह जिल्ह्यातील कृषिसेवा केंद्रांची तपासणी करून माहितीदर्शक फलक लावण्याची मोहीम उघडली. वाशिम शहरातील कृषिसेवा केंद्रांमध्ये आता माहितीदर्शक फलक झळकत असल्याचे दिसून येत आहे.