शहरं
Join us  
Trending Stories
1
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
4
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
5
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
6
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
7
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
8
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
9
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
10
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
11
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
12
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
13
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
14
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
15
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
16
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
17
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
18
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
19
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
20
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आरोग्य कर्मचा-यांना मिळाले वेतन

By admin | Updated: June 11, 2016 02:59 IST

प्रशासनाची दखल: नियमित वेतन करण्याची मागणी

मंगरुळपीर (जि. वाशिम): येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना मागील दोन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात लोकमतमध्ये ५ जून रोजी ह्यआरोग्य कर्मचार्‍यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकीतह्ण या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित होताच या कर्मचार्‍यांना ६ जून रोजी एका महिन्याचे वेतन अदा करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या अडचणी थोड्याफार कमी झाल्या आहेत. मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार, लिपिक, तसेच इतर कर्मचारी मिळून जवळपास ८0 पेक्षा अधिक अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी २८ कर्मचारी हे कायम असून, ४५ कर्मचारी कंत्राटी आहेत. कायम कर्मचार्‍यांमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकार्‍यांसह अधिपरिचारिका आणि सफाई कामगारांचा समावेश आहे. या सर्व कर्मचार्‍यांना मार्च २0१६ नंतर वेतन मिळालेले नाही. मागील काही महिन्यांपासून कर्मचार्‍यांचे वेतन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहे. कार्यालय अधीक्षक सर्व कर्मचार्‍यांच्या वेतनाची बिले ऑॅनलाइन पद्धतीने कोषागार कार्यालयाकडे सादर करीत असतात. बिले सादर केल्यानंतर कर्मचार्‍यांना साधारण आठवडाभराच्या आतच वेतन मिळते; परंतु मंगरुळपीर येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे वेतन दोन महिन्यांपासून थकीत असल्याने अधिकारी व कर्मचार्‍यांना विविध समस्यांना तोंड देण्याची वेळ आली होती. वेतन थकल्यामुळे घर बांधणीसाठी घेतलेल्या गृहकर्जापोटी बँकांकडून हप्ते भरण्यासाठी वारंवार तगादा सुरू झाला होता, तसेच वीज बिलाची रक्कम भरण्यासाठीही त्यांना आग्रह करण्यात येत होता.