मंगरूळपीर पोलीस स्टेशनांतर्गत ४८ गणेश मंडळांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST2021-09-12T04:47:46+5:302021-09-12T04:47:46+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियम पाळून गणेशमूर्तीची ...

Establishment of 48 Ganesh Mandals under Mangrulpeer Police Station | मंगरूळपीर पोलीस स्टेशनांतर्गत ४८ गणेश मंडळांची स्थापना

मंगरूळपीर पोलीस स्टेशनांतर्गत ४८ गणेश मंडळांची स्थापना

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियम पाळून गणेशमूर्तीची स्थापना करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरात ११ सार्वजनिक गणेश मंडळांनी, तर ग्रामीण भागात ३७ मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मंगरूळपीरचे पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे यांनी गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांना केले आहे.

---------

तालुुक्यातील ३२ गावांत एक गाव, एक गणपती

मंगरूळपीर तालुक्यात शहरात ११, तर ग्रामीण भागांत ३७ गावांत गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यापैकी २२ गावात एक गाव, एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळांनी गर्दी टाळून कोरोना नियमांचे पालन करावे तसेच मिरवणूक काढता साधेपणाने गणेश विसर्जन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Establishment of 48 Ganesh Mandals under Mangrulpeer Police Station