दोनशे किमी सायकलवारीतून पर्यावरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:01 IST2020-11-24T15:55:45+5:302020-11-24T16:01:20+5:30

२०० किमी सायकल चालवून या सायकलस्वारांनी पर्यावरणाचा संदेश दिला.

Environmental message from 200 km cycling | दोनशे किमी सायकलवारीतून पर्यावरणाचा संदेश

दोनशे किमी सायकलवारीतून पर्यावरणाचा संदेश

ठळक मुद्देस्थानिक पाटणी चौक येथून या सायकल स्पर्धेला सुरुवात झाली.२०० कि.मी. चे अंतर स्पर्धकांनी वेळेच्या आत पुर्ण केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या चार वर्षापासून ब्रेवेट स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना सायकलव्दारे पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणार्‍या वाशिम सायकलस्वार ग्रूप व वाशिम रॉदीनर ग्रूपच्यावतीने २२ नोव्हेंबर रोजी आयोजित २०० किमी सायकल स्पर्धेमध्ये अमरावती, आर्णी, पुसद आणि वाशिम जिल्ह्यामधून २९ सायकलप्रेमींनी सहभाग घेतला. २०० किमी सायकल चालवून या सायकलस्वारांनी पर्यावरणाचा संदेश दिला.
स्थानिक पाटणी चौक येथून या सायकल स्पर्धेला सुरुवात झाली. सागर रावले व अधिराज राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा प्रारंभ केला. साडे तेरा तास अशा निर्धारीत वेळेत वाशिम , बिटोडा भोयर, मंगरुळपीर, कारंजा, खेर्डा, धनज व परत वाशिम असे २०० कि.मी. चे अंतर स्पर्धकांनी वेळेच्या आत पुर्ण केले. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता स्पर्धा समाप्त झाल्यानंतर सर्व स्पर्धकांचे छत्रपती शिवाजी चौकानजीक स्वागत करण्यात आले. या सायकल स्पर्धेत अमरावती येथील पोलीस विभागातील रेस्क्यु टिमच्या महिला पोलीस त्रिवेणी बेद्रे,  देव भोजने, विजय धुर्वे, नितीन अंबारे, धिरज बोडखे, गणेश बोरोकार, ऋषीकेश इंगोले, बाबाराव मेश्राम, मंगेश भागवत, अनंत जाधव, अजय क्षिरसागर, अजय कोट्टलवार, सुनिल राणे, सतिश पाचखंडे, अभिजित अंदोरे, प्रमोद बुटले, प्रशांत बक्षी, सुनिल मुंदे, राहुल तुपसांडे, युसुफ शेख, मारोती भोयर, डॉ. विपुल पवार, चेतन शर्मा, नंदकिशोर राऊत, विशाल ठाकुर, राजेश जाधव, नारायणराव ढोबळे आदींनी सहभाग घेतला होता.

Web Title: Environmental message from 200 km cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.