शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत २३ गावांत ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:47 IST

सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये शिरपूर टाउनमधील ११ गणेश मंडळांचाही सहभाग आहे. ...

सर्वांच्या आवडत्या गणेशोत्सवाला १० सप्टेंबरपासून उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये शिरपूर टाउनमधील ११ गणेश मंडळांचाही सहभाग आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासन व प्रशासनातर्फे करण्यात आली होते. यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या दर्शनही पोलीस प्रशासनाने केले. याचा सकारात्मक परिणाम गणेशोत्सवामध्ये दिसून आला आहे. गणेशोत्सवामध्ये शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २३ गावांमध्ये एक गाव गणपती संकल्पना राबविण्यात आली, तर शिरपूर टाउनमध्ये संत सावतामाळी, जय संभाजी, जय बजरंग, मराठा, जय भारत, औंढा नागनाथ, जय शिवराज, संत ज्ञानेश्वर, जय भवानी, सुवर्णकार, जय महाराष्ट्र असे ११ मंडळांच्या वतीने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण ४१ ठिकाणी श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. गणेश उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा. याबाबत अगोदरच प्रशासनाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आले आहेत.

---------

या गावांत ‘एक गाव एक गणपती’

शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत मुठा, येवता, दुधाळा, ढोरखेडा वाघळुद, शेलगाव बगाडे, मांगुळ झनक, गोवर्धना, केशवनगर, नावली, मिर्झापूर, जोगेश्वरी, कुकसा, बोराळा जहागीर, शिरसाळा, बेलखेडा, पेनबोरी, जायखेडा, वसारी, शेलगाव खवणे, पार्डी तिखे, दापुरी कालवे व मसला पेन इत्यादी ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना प्रशासनाच्या पुढाकाराने स्थानिक रहिवाशांनी राबविली आहे.