शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाचा दर पोहोचला १३० रुपये प्रतिकिलोवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:37 IST

.................... वाशिममध्ये कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळले वाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलोसह अन्य ठिकाणचा एक असे कोरोना विषाणू ...

....................

वाशिममध्ये कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळले

वाशिम : शहरातील नवीन आययूडीपी कॉलोसह अन्य ठिकाणचा एक असे कोरोना विषाणू संसर्गाने बाधित दोन नवे रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी खबरदारी बाळगून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

....................

प्रवासीच मिळत नसल्याने ऑटोचालकांवर उपासमार

शिरपूर जैन : लॉकडाऊनदरम्यान ८ ते ९ महिने व्यवसाय पूर्णत: ठप्प झाल्याने ऑटोचालक आर्थिक अडचणीत सापडले होते. अशात शिरपूर येथे पर्यटकांची रेलचेलच नसल्याने ऑटोचालकांना सध्या प्रवासीच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

.......................

अडोळी येथे योग शिबिर उत्साहात

वाशिम : तालुक्यातील ग्राम अडोळी येथे बुद्धसासन फाउंडेशनने १७ जानेवारी रोजी योग व प्राणायाम शिबिर घेतले. योग प्रशिक्षक म्हणून सुधाकर नगरे यांचे मार्गदर्शन लाभले. योगाचे विविध प्रकार, प्राणायाम, कपालभाती, भ्रस्तीका याबाबत त्यांनी माहिती दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बुध्दसासन फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज पडघान, अ‍ॅड. पट्टेबहादूर, सतीश खंडारे, हरिष पडघान, संदीप पडघान, मधुकर पडघान, शरद खंडारे, प्रशांत पडघान, प्रमोद पडघान आदींनी परिश्रम घेतले.

...................

अवैध वाळू वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : पर्यावरण विभागाची परवानगी नसल्याने जिल्ह्यातील कुठल्याच वाळूघाटाचा लिलाव झालेला नाही. असे असताना अव्वाच्या सव्वा दर आकारून वाळूची अवैध वाहतूक सुरूच आहे. या गंभीर बाबींकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

...................

मधुमक्षिका पालनाकडे वळण्याचे आवाहन

वाशिम : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्रय रेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. या माध्यमातून भरीव प्रयत्न केले जात असून, महिलांनी मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

................

जलसंपदाकडून कॅनॉलची दुरूस्ती

अनसिंग : रबी हंगामातील पिकांसाठी सिंचन प्रकल्पांमधील पाणी कालव्यांव्दारे सोडले जात आहे. काहीठिकाणचे कालवे नादुरूस्त झाले होते. त्याची जलसंपदाकडून दुरूस्ती केली जात आहे.

.................

सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले

तोंडगाव : परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाने व्यवस्था निर्माण केल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचे ‘आत्मा’चे तालुका समन्वयक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितले.