शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे अभ्यास गट, शेताच्या बांधावर पोहोचविली ज्ञानगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने शिक्षणाचे स्वरूपच बदलून टाकले. शिक्षकांनी मात्र या वातावरणाशीही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने शिक्षणाचे स्वरूपच बदलून टाकले. शिक्षकांनी मात्र या वातावरणाशीही स्वत:ला जुळवून घेत आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची कास कायमच ठेवल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील जिप केंद्र शाळेतील शिक्षक उमेश गहुले यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. उमेश गहुले यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून गल्लीगल्लीत विद्यार्थ्यांचे अभ्यास गट तयार केले, एवढेच काय तर शेताच्या बांधावर ज्ञानगंगा पोहोचवून विद्यार्थ्यांना धडे दिले.

मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे जिल्हा परिषदेची केंद्र शाळा आहे. या ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. या शाळेतील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी धडपडत असतात. त्यात शिक्षक उमेश गहुले यांनी गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गाच्या काळातही शाळेत गार्डन तयार केले. परसबागेचीही निर्मिती केली. विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद असली तरी कोठारी येथील गल्ली गट तयार करून विद्यार्थ्यांकडून ओट्यावर अभ्यास करून घेतला.

०००००००००००००००००००००००

पटसंख्येत केली लक्षणीय वाढ

कोठारी जिप केंद्र शाळेत उमेश गहुले यांनी त्यांचे वरिष्ठ तथा प्रभारी मुख्याध्यापक ज्ञानदेव गवई व इतरांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत पटसंख्येत लक्षणीय वाढ केली. आजघडीला या जिप शाळेतील पहिली ते सातवीच्या वर्गात एकूण २५३ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील जिप शाळांपैकी सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून कोठारी शाळेचा उल्लेख होत आहे.

०००००००००००००००००००००००

शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी

शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देतानाच गणवेश वितरण, पोषण आहार वितरण, शिष्यवृत्तीचे वाटप, विविध शालेय स्पर्धा परीक्षेची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी कोठारीच्या शाळेत केली जात आहे. यात शाळेतील ६५ आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या ८० हजार ५०० रुपयांच्या धनादेशाचे वितरण केले. शिवाय यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी ७५ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सादर केले आहेत.

०००००००००००००००००००००००

गृहभेटीच्या माध्यमातून प्रगतीचा आढावा

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक उमेश गहुले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचे गल्ली गट तयार करताना त्यांना तेथेच धडे देण्याचे कार्य केेले. शिवाय त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी गृहभेटीचा उपक्रमही राबविला आहे. या अंतर्गत ते विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधून माहिती घेत असतात.

००००००००००००००००००००००००

कोट : विद्यार्थ्यांचा केवळ अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे, हाच उद्देश नाही. त्यांची शैक्षणिक प्रगती आणि शारीरिक विकासही महत्त्वाचा आहे. त्यामुळे

पालकांशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेतो व समस्यांचे निराकरणही करतो. यासाठी प्रभारी मुख्याध्यापक ज्ञानदेव गवई यांच्यासह सहकाऱ्यांचे सहकार्यही मिळते.

-उमेश गहुले, शिक्षक जिप शाळा, कोठारी

040921\04wsm_1_04092021_35.jpg

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे अभ्यास गट,