मुसळधार पावसामुळे शेततळे काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:50 IST2021-09-08T04:50:23+5:302021-09-08T04:50:23+5:30

पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील मिळून ६१ गावे सहभागी झाली होती. त्यापैकी धनज बु., जानोरी, ...

Due to torrential rains near farms | मुसळधार पावसामुळे शेततळे काठोकाठ

मुसळधार पावसामुळे शेततळे काठोकाठ

पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील मिळून ६१ गावे सहभागी झाली होती. त्यापैकी धनज बु., जानोरी, दोनद बु. बांबर्डा, विळेगाव या कारंजा तालुक्यातील गावांसह मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन, पिंपरी खु., मसोला, शेंदुरजना मोरे आदी गावांत शेततळ्यांची कामे श्रमदान आणि बीजेएसने पुरविलेल्या जेसीबी, पोकलन मशीनच्या आधारे करण्यात आली. या शेततळ्यांमुळे गावातील भूजल पातळी टिकून राहण्यास आणि सुधारण्यास ही मदत होत आहे. यंदा पुरेशा पावसाअभावी बहुतांश शेततळे पूर्णपणे भरले नव्हते ; परंतु सोमवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश शेततळे शंभर टक्के भरले आहेत. त्यात मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन सह कारंजा तालुक्यातील जानोरी, दोनद बु आणि धनज बु. येथील शेततळ्यांचा समावेश आहे.

----------

शेतकऱ्यांना मत्स्यपालनास आधार

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी श्रमदान करून शेततळ्यांची कामे केली. या शेततळ्यासाठी भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) सहकार्य ही लाभले. आता हे शेततळे पूर्णपणे भरले असून, या शेततळ्याचा रब्बी हंगामात सिंचनासाठी आधार होत आहेच शिवाय मत्स्यपालन करण्यासाठीही शेतकऱ्यांना आधार होणार आहे.

Web Title: Due to torrential rains near farms